Breaking News
recent

स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी.


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   दि.१९ऑगस्ट २०२२,रोजी मलकापूर शहरातील,स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) मलकापूर. येथे दरवर्षाप्रमाणे जन्माष्टमी हा उत्सव मोठ्या उत्साहामय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात बाल कृष्णाच्या प्रतिमेस माल्यार्पण व औक्षण करून करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता नववीचा विद्यार्थी गीत राणे याने बासरी वादन करून प्रेक्षकांची व विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्याचबरोबर इयत्ता आठवीचा विद्यार्थी निधेय पटेल याने आपल्या भाषणाच्या माध्यमातून कृष्ण जन्माष्टमीचे महत्व सांगितले. शाळेतील विद्यार्थिनींनी समूहगीत तसेच समूह नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. 

  उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दहीहंडी! ही दहीहंडी फोडण्याची स्पर्धा इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये रंगली त्यात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या कसरतीने दहीहंडी फोडून विजय मिळविला . विजेत्या संघाला शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  त्याचबरोबर शाळेतील नर्सरी ते केजी टू या वर्गातील बालसुकुमारांनी राधा व कृष्ण यांची वेशभूषा परिधान करून संपूर्ण वातावरण कृष्णमय करून टाकले.

        या सर्व कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार व शाळेचे उपमुख्याध्यापक श्री केदार शर्मा उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुदीप्त सरकार यांनी आपल्या मनोगताच्या आधारे विद्यार्थ्यांना कृष्णजन्मष्टमीचे महत्व सांगितले.

      या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीचे विद्यार्थी श्रीतेज जगदाळे व सीअल पारख यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार सुरज बयस याने सादर केले. अशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Powered by Blogger.