यवत येथील तृतीयपंथीयांची गेल्या 35 वर्षाची गौरी गणपतीची भव्य सजावटीची अप्रतिम परंपरा
दौंड प्रतिनिधी विजय कदम .
यवत (दौंड)- दौंड तालुक्यातील यवत येथे प्राचीन तृतीयपंथीयांचा वाडा असून इथे अनेक तृतीयपंथीय बांधव ग्रामस्थांबरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध जोपासत मोठ्या गुण्यागोविंदाने राहत आले आहेत.
गेल्या 35 वर्षाची अखंडित परंपरा जोपासत गुरुवर्य दीपा रंजिता नायक (नानी) ह्या गौरी गणपतीचा सण अतिशय उत्साहपूर्ण व भव्य दिव्य स्वरूपात करत असतात यवत व यवत पंचक्रोशीतील अनेक महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने येथे गौरी गणपतीची आरास पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत असतात.
पुणे व दौंड परिसरातील अनेक नामांकित मंडळी यावेळी येथे सदिच्छा भेट देत असतात यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी पुणे जिल्हा भाजपाच्या महिला आघाडी अध्यक्षा कांचन कुल यांनी यावेळी बोलताना सांगितले की दरवर्षी वेळात वेळ काढून मी येथे आवर्जून दर्शनासाठी येत असते व येथील गौराईची आरास पाहून माझे मन प्रसन्न होते. व दरवर्षी समाज उपयोगी संदेश या देखाव्यातून देण्यात येत असतो.
यावेळी बोलताना तृतीयपंथींचे गुरु नानींसांगितले की गेले दोन-तीन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते व भगवंताच्या कृपेने आता सर्व काही ठीक झाले आहे व यावेळी देखील मी देवाकडे हीच प्रार्थना करते की ह्या सर्व रोगराई पासून सर्व मानव जातीचे व प्राणीमात्राचे संरक्षण कर.
यावेळी गुरुवर्य रंजिता नायक पुणे दीपा गुरु नाणी, मोना दीदी पवार, अनिल गुरु, आचल गुरु दिव्या, पल्लवी गुरु लखन, विकी गुरू, सीमा दिदी,काजल दिदी व मोठ्या संख्येने यवत परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.