Breaking News
recent

पंचनाम्याचे थोटाग बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार मदत द्या : स्वाभिमानी ची मागणी


 शेगाव तालुक्यात मोठया प्रमाणात  मुसळधार पाऊस पडत असेल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होत आहे.यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. वेळोवेळी पडलेला मुसळधार पाऊसामुळे शेकडो एकर जमिनी खरडुन गेल्या. येवढ्यावरच न थांबता पाऊस सतत सुरू राहल्याने पिकांची वाढ खुटली. वाण किळीने लाखो एकरातील सोयाबीन सारखे पिके फस्त केली. कापूस, सोयाबीन,तुर, ज्वारी, उडिद,मुंग इत्यादी पिकासह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. 

    या अचानकपणे आलेल्या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त आहे. महागाईचा आकडा गगणाला भिडला आहे. त्यामुळे  कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. आरोग्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, विश्व दारिद्र्य आले असल्याने मुला मुलिचे थांबलेले लग्ण, त्यामुळे या माणसिकतेने शेतकरी खचुन गेले असल्याने या सर्व सामना कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनसमोर ठासुन उभा आहे. करीता सरकारने वेळ काढु थोटांग बंद करून विना विलंब शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या.पिक विमा कंपन्यांनी जाचक अटी न लावता शंभर टक्के पिक विमा मंजूर करून तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करा. 

    अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन कोणत्याही क्षणी शेंगाव तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला असून या वेळेस शेगाव तालुक्यातीलीत शेतकरी मोठया संख्येने उपस्तित होते.


Powered by Blogger.