Breaking News
recent

सद्धधम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण सेवा ट्रस्टच्या वतीने भव्य प्रबोधन शिबिर संपन्न



नांदुरा :- सद्धधम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण सेवा ट्रस्ट लोनवडी यांच्यावतीने दि. 18 सप्टेंबर रोजी नांदुरा शहरातील श्री. शिवाजी हायस्कूलमध्ये भव्य प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदधम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्टचे अध्यक्ष संतोष तायडे होते. यावेळी मान्यवरांनी विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. भारतामध्ये बौद्ध धम्म गतिमान कधी होईल? या विषयावर प्रभात खिल्लारे देऊळगाव मही यांनी मार्गदर्शन केले. बुद्धकालीन वर्षवास व वर्तमान परिस्थितीचा वर्षवास यावर सुनंदा नितनवरे, नागपूर यांनी तर स्तूप विहार पॅगोडा कसे निर्माण केले पाहिजे? या विषयावर श्रीलेखा नगराळे वास्तु विशारद नागपूर यांनी सखोल मार्गदर्शन केले. पी.जी. तायडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी किशोर इंगळे, गणवीर सर, समाधान हेलोळे, गोविंदा वाघ, दिनकर वाकोडे, राजेश इंगळे, विनोद चव्हाण, निवृत्ती धुरंदर, श्रीकृष्ण वाकोळे, पत्रकार शैलेश वाकोडे, दिनेश ब्राह्मणे, संतोष तायडे, वैभव वानखडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन साळवे सर यांनी केले सदर शिबिराला परिसरातील शेकडो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

Powered by Blogger.