नगर परिषदेने मातंगपुरीचा ताबा घेतला खरा. परंतु पुनर्वसितांना पुनर्वसित जागेचा (7/12.8अ ) देणार का.? : गोपाल तायडे
प्रतिनिधी
शेगाव विकास आराखडा अंतर्गत मातंगपुरीचे पुनर्वसन पाच वर्ष अगोदर करण्यात आले होते. मुबलक अश्या साधन सुविधा पुरवनार असल्याचे आमिष दाखवून मातंग पुरी परिसरातील कुटूंबीयांना भूल थापा देऊन. पुनर्वसन या गोळ नावा खाली बापपूर्वजांची जमीन अत्यंत क्रूरतेने खाली करून घेण्यात आली.आता नगर परिषदेने 22 सप्टेंबर2022 रोजी मातंगपुरी परिसरातील ही जमीन ताब्यात घेतली आहे.परंतु तिथं राहत असलेला मातंग, चर्मकार, मुस्लिम कुटूंबीयांना पुनर्वसित करण्यात आलेल्या जागेचा (7/12. 8अ )अजून पर्यंत देण्यात आलेला नाही. यात काही गोड बंगाल तर नाहीना असा प्रश्न मातंगपुरी परिसरातील पुनर्वसित कुटूंबीयांना पडला आहे . पुनर्वसन करीत असताना पुनर्वसितांना योग्य न्याय देण्यात येईल व सर्व साधन सुविधा मुबलक प्रमाणात पुरविण्यात येतील असे नगर परिषद प्रशासना कडून सांगण्यात आले होते. साधन सुविधा म्हणजे 1)पुनर्वसिन करण्यात आलेल्या जागेचा 7/12. 8अ सदनिका भूमिअभिलेख कार्यालयामध्ये नोद.1)पुनर्वसित कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख सानुग्रह मदत. 3) पुनर्वसित कुटुंबीयानां रोजगार उपलब्ध करून देने.4)किमान दहा वर्ष घर,पट्टी पाणी पट्टी माफ करणे , 5) मातंगपुरी परिसरात दुकान असणाऱ्यांना दुकान देने.5) पुनर्वसित जागेत प्राथमिक शाळा, अंगणवाळी ची व्यवस्था करणे.
6) पुनर्वसन नियमानुसार प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट देने. हया व अश्या अनेक सुविधा देऊ असे सांगण्यात आल्याने भोळा भाभळा शिक्षणाचे प्रमाण कमी असलेला मातंगपुरी परिसरातील नागरिक प्रशासनाच्या आमिषाला बळी पडून आपल्या बाप पूर्वजांची लाख मोलाची जागा कवळी मोलात नगर परिषदेला दिली. आता नगर परिषदेने मातंगपुरी या जागेला कंपाऊंड करून जागा ताब्यात घेतली आहे. परंतु तिथं आगोदर राहत असलेला मातंगपुरी परिसरातील कुटूंबियांना पुनर्वसन केलेल्या म्हाडा कॉलनी मधील जागेचा 7/12.8अ दिला का.? नगर परिषदेने पुनर्वसितांना जे साधन सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले का.? हा प्रश्न इथं उधभवतो असे असून सुद्धा नगर परिषद मातंगपुरी ची जमीन ताब्यात घेते परंतु मातंगपुरी वसीयांना राहत असलेल्या जागेचा 7/12 8अ देत नाही याला काय म्हणव. शासन प्रशासनाला सहकार्य करण्याचा हाच मोबदला का.?पुनर्वसन केलेल्या जागेचा (7/12.8अ ) व आश्वासन दिलेल्या साधन सुविधा पुरवण्यात यावे अन्यथा मातंगपुरी परिसरातील नागरिकांचा उद्रेक पाहण्यास मिळाला तर नगर परिषदेने यात नवलं वाटू देऊ नये.