समता संघटनेच्या" वतीने आमरण उपोषणास सुरुवात
प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे
जिल्हा बुलढाणा समता संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील वन अतिक्रमणधारक व गायरान जमीन अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकार्यालय बुलढाणा येथे भव्य आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली. बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा वन हक्क समितीने चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण धारकांची दावे नामंजूर केले आहे. तरी सदर दाव्यांची अचूक फेर तपासणी करून पात्र अतिक्रमण धारकांना कायम जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता ( सेवा पंधरवाडा ) १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या मोहिमेद्वारे पात्र वन हक्क दावे मंजूर करून तात्काळ जमिनीचे पट्टे वाटप करावे. वन हक्क अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना वन विभागाने अतिक्रमण निष्काणाबाबत दिलेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्या. महसूल व वन विभागाच्या दिनांक २८ नोव्हेंबर १९९१ शासन निर्णय नुसार गायरान व वन जमिनीवर कृषी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे पात्र असलेली अतिक्रमणे तात्काळ नियामानुकुल करून जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे. महसूल व वन विभागाच्या दिनांक १२ जुलै २०११ शासन निर्णय रद्द करून सर्वांसाठी शेती धोरण राबवून सन 2011 पर्यंत कृषी प्रयोजनासाठी अतिक्रमित केलेल्या जमिनीचे कायम पट्टे वाटप करण्यात यावे. या प्रमुख मागण्या घेऊन समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी गवई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष आम्रपाल वाघमारे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय दोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यालय बुलढाणा येथे भव्य आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी समता संघटनेचे कायदेशीर सल्लागार ऍड .काळे साहेब, महिला जिल्हाप्रमुख मालाबाई साळवे ,सुभद्राबाई वाकोडे, यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेड ,राहेरा ,गुळभेली ,कुरा तरोडा, कोथळी, वडनेर भोलजी, अमडापूर, वरखेड ,साकेगाव, हेलगा, टाकरखेड, धोडप इत्यादी गावातील वन जमीन आणि गायरान जमीन अतिक्रमण धारक शेतकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने दिवस-रात्र उपस्थित होते.