संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी पवन सोळंके
संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हा बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत लोणवाडी येथील संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते पवन सोळंके यांना संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले. ही नियुक्ती संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गजानन पारधी,विभागीय अध्यक्ष इंजी.गजानन भोयर, यांच्या हस्ते देण्यात आली.पवन सोळंके यांचे नेतृत्वगुण ओळखून ही नियुक्ती देण्यात आली. व जिल्हाभर विद्यार्थी युवकांचे संघटन उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.यावेळी बुलडाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा सचिव डॉ.शरद पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष एस.पी.सांबारे सर,जिल्हा संघटक डॉ.सागर महाजन,जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच यात महत्त्वाचे म्हणजे मध्यंतरी काळात संभाजी ब्रिगेडपासून दुरावलेले मोताळा येथील श्रीकृष्ण बांगर यांची परत घरवापसी झाली यावेळी वरिष्ठांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले