नॅशनल हायवे क्रमांक सहा चे ठेकेदार नरमले ; आमरण उपोषणाचा ईशारा देताच उड्डाणपूला शेजारील सर्व्हिस रोडचे काम तात्काळ सुरू
![]() |
उड्डाणपुला शेजारील दुकानदारांनी दिला होता आमरण उपोषणाचा इशारा |
मलकापुर:- शहराबाहेरील नॅशनल हायवे क्रमांक सहावर अमरावती ढाब्यानजीक उड्डाणपूलाचे कार्य कल्याण टोल प्राधीकरणाचे सुरू असुन या उड्डाणपूल च्या दुतर्फा सर्व्हिस रोड असुन या सर्व्हिस रोड मध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे, सर्व्हिस रोडवर असलेल्या दुकानात वाहने ये-जा करण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्राहक या रोडवरील दुकानात फिरकत नसल्याने त्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे वेळोवेळी तोंडी सुचना देऊनही ठेकेदार जुमानत नसल्याने दुकानदारांनी शिवसेनेचे गजानन ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना निवेदन सादर केले असुन संबंधित ठेकेदाराने दोन दिवसांत या रस्त्यावर मुरुम न टाकल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा दि.07 सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे दिला होता.
शिवसेनेच्या आंदोलनाच्या धास्तीने शनिवारी सकाळी आठ वाजेपासुन या रस्त्यावर टिप्पर द्वारे मुरुम टाकुन जे.सी.बी द्वारे फैलावत रोड रोलर ने त्या रस्त्याची दबाई करण्यात आली.तात्काळ रस्त्याचे काम सुरू झाल्याने व उपासमारीची वेळ टळल्याने उड्डाणपुला शेजारील सै.सोहेल, अमर पिंजरकर, सै.आसीफोद्दीन, अब्दुल अजीज, सै.अन्सार, शे.नसीर, शे.सलीम, नदीमखान सह आदीं दुकानदारांनी शिवसेनेच्या गजानन ठोसर यांचे आभार मानले.