गणेश विसर्जनाच्या दिवशी मद्यविक्री बंद
प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश विसर्जन ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. विसर्जनाच्या जिल्ह्यात मद्य विक्री बंद राहणार आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करून ९ सप्टेबर आणि जेथे ज्या दिवशी गणेश विसर्जन असेल तेथे त्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअर बार अनुज्ञप्ती, एफएल / बीआर-२, अनुज्ञप्ती इत्यादी अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.