प्रभा फाळके खून प्रकरणी दोघा बाप-लेकास अटक
![]() |
आरोपी विश्वास भास्कर गाढे व मुलगा भार्गव गाढे |
मलकापूर प्रतिनिधी
एका महिलेची क्रूरपणे हत्या करून मुक्ताईनगर - बऱ्हाणपूर रोडवरील गावाजवळ प्लास्टीकच्या पिशवीमध्ये मृतदेह टाकून फेकून दिल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. सदर मृतदेह ही मलकापूर शहरातील गणपती नगर भाग २ येथे राहणाऱ्या व न. प. च्या सेवानिवृत्त महिला कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके यांचा असल्याचे उघड झाले होते. वृत्त झळकताच मलकापूर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. तर या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी शहरात येवून विश्वास भास्कर गाढे ( वय ५०), भार्गव विश्वास गाढे (वय २१) रा. गणपती नगर, मलकापूर या दोघा बाप-लेकास अटक केली असून विश्वास गाढे याची तब्येत बिघडल्याने त्यास शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पोलीस संरक्षणात दाखल करण्यात आले आहे. तर मुलगा भार्गव गाढे यास मुक्ताईनगर पोलीस अटक करून घेवून गेले. याबाबतची माहिती अशी की, शहरातील गणपती नगर भाग २ मध्ये राहणाऱ्या श्रीमती प्रभा माधव फाळके ( वय ६३ ) रा. गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातचअसलेल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या
. २९ ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह पोलिसांनी पुलाच्या वर काढला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. श्रीमती प्रभा फाळके ह्या घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा रितेश माधव फाळके याने मलकापूर शहर पो. स्टे. ला दिली होती. याबाबत मलकापूर शहर पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांनी पाठविलेला फोटो त्या महिलेच्या मुलाला दाखविला असता ती आपली आई असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले.
त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. भार्गव विश्वास गाठे (वय २१) रा. गणपती नगर, मलकापूर या दोघा बाप लेकास पोलिसांनी आज १ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. प्रभा शेळके यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी बाप-लेकाने त्यांच्या राहत्या घरात प्रभा फाळके यांचा निर्घुण खुन करुन त्यांच्या गळ्यातील पोथ, गोफ, अंगठी असा दोन लाखांचा मुद्देमाल काढून घेत फाळके यांचा मृतदेह जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन दोघांनी मोटारसायकल वरुन घोडसगांव (चिखली) मार्गे बऱ्हाणपूर रोडवरील कुंड गावानजीक पुर्णा नदीवरील पुलाखाली फेकून दिला होता.
याप्रकरणी काल ३१ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा पो. नि. किरणकुमार बकाले, मुक्ताईनगर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ आज दोन्ही बाप-लेकास अटक केल्यानंतर विश्वास गाढे याची प्रकृती बिघडल्याने त्यास पो. नि. शंकर शेळके, ऐ. पी. आय शेवाळे, पो. कॉ. रवि धनगर, , धर्मेंद्र ठाकुर, राहुल बेहरवाल, नितिन व्यवहारे मलकापूर शहरात दाखल झाले होते. नियोजनबध्दरित्या तपासचक्रे वेगाने फिरवत फाळके यांच्या घराशेजारी राहणाऱ्या विश्वास भास्कर गाढे दाखल करण्यात आले. तर मुलगा भार्गव गाढे यास मुक्ताईनगर पोलिसांनी अटक करून मुक्ताईनगर येथे घेवून गेले. त्यास २ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली