राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्हा संघाची निवड
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी सिनिअर पुरुष व महिला व ९ वी सबज्युनिअर सॉफ्ट टेनिस अजिक्यपद स्पर्धा मुले व मुली राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार असून हा संघ पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पधेत सहभाग घेणार आहे.
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी बुलडाणा जिल्हा संघाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीत अजिक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतून प्राविण्यप्राप्त खेळाडु खालीलप्रमाणे असून हेच खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
निवड झालेल्या जिल्हा संघाची घोषणा सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असो. चे अध्यक्ष संतोष बोरगावकर व कार्याध्यक्ष राजेश महाजन यांनी केली. यामध्ये सिनिअर पुरुषः विवेक जाधव, अभिषेक मानकर, शिरीष खराडे, अक्षय चव्हाण, निहाल खेडकर, मनीष वरोडे,दत्तयराय कोहत्कर, प्रफुल्ल वानखेडे, प्रशिक्षक प्रा. कैलाश पवार, व्यवस्थापक विजय पळसकर. सबज्युनिअर मुलेः मंथन कदम, लोकेश चांडक, सार्थक जोगदंड, सोहम देशमुख, प्रणव रत्नपारखी, वेदान्त जगदाळे, कार्तिक कुदळे, सोमेश गवळी. सिनिअर महिलाः कु. सृष्टी होले, कु. भक्ती साळुंके, कु. विनिता खेदड, कु.जानवी खर्चे, कु. मयुरी बुले, कु. रोशनी खरात, कु. स्वरा देशमुख, प्रशिक्षक प्रा. नितीन भुजबळ, व्यवस्थापक राजेश्वर खंगार. सबज्युनिअर मुलीः कु. विनिता खेदक, कु. जानवी खर्चे, कु. पलक परदेशी, कु. निधी झनके, कु. प्रिया चौधरी, कु. सारा सातव, कु. सरिता पाटील, कु. माहेश्वरी पवार यांचा समावेशआहे.
निवड झालेल्या खेळाडुंना आज ११ सप्टेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे टी शर्ट वाटपाचा सोहळा पार पडला. यावेळी तहसीलदार राजेंद्र सुरडकर, न.प. मुख्याधिकारी रमेश ढगे, राजेंद्र वाडेकर, आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू कु. गौरी सोळंके, अनिल गांधी, राम अग्रवाल, टी शर्ट प्रायोजक चंद्रकांत साळुंके सचिव क्रिकेट असोसिएशन, विजय पळसकर, विनोद राजदेव आदी उपस्थित होते.निवड झालेल्या खेळाडूंचे १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान मलकापूर येथे प्रशिक्षण सुरू होणार असून हा संघ १४ सप्टेंबरला रवाना होणार आहे.