Breaking News
recent

गो.वि.महाजन विद्यालयात मोफत स्पर्धा परिक्षा वर्ग सुरू.



मलकापूर 

     मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचलीत गोविंद विष्णू महाजन विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांना भविष्यात प्रशासकीय सेवेत संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने मोफत स्पर्धा परिक्षा वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. श्री.साई अकॅडमी मोताळा चे संचालक प्रमोद कौसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभ्यास वर्गात विद्यार्थ्यांना पोलिस दल, सैन्य दल, अग्निविर तसेच शासनाच्या विविध विभागासाठी होणार्या पदभरतीसाठी घेण्यात येणार्या परिक्षांच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, भाषा यांसारख्या सर्वच विषयांचे सखोल मार्गदर्शन व सराव करून घेतल्या जाणार आहे. 

    ग्रामीण विद्यार्थ्यांना भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून 'गाव तेथे मैदान, घर तेथे नोकरी' या अभियाना अंतर्गत हे वर्ग पुढे देखील नियमित सुरू राहणार असल्याचे श्री.साई अकॅडमी मोताळा चे संचालक प्रमोद कौसकर यांनी सांगितले. 

   तर गोविंद विष्णू महाजन विद्यालयात दर वर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोरच व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून अणेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. स्वयंरोजगार मिळविण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. यंदाच्या वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी नियमित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग देखिल सुरू करण्यात आलेले असल्याची माहिती प्राचार्य एम.पी.कुयटे यांनी दिली. 

   विद्यालयाच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन विभागामार्फत राबविल्या जाणार्या या उपक्रमांतुन विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी दुपारी १:०० ते ३:०० या वेळेत मोफत स्पर्धा परिक्षा वर्ग सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून साई अकॅडमीचे संचालक प्रमोद कौसकर यांच्या द्वारे विविध विषयांवर नियमित मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संधिचा अवश्य फायदा घेण्याचे आवाहन या उपक्रमाचे संयोजक प्रा.डाॅ. नितीन भुजबळ यांनी केले आहे.


Powered by Blogger.