Breaking News
recent

राजे छत्रपती महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना. उद्घाटन संपन्न



       स्थानिक राजे छत्रपती महाविद्यालय धामणगाव बढे, येथे आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्राध्यापक उमेश दैवे म्हणून लाभले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम हे होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित डॉ.नितीन जाधव डॉक्टर गोविंद गायकी डॉ. गजानन वानखेडे हे मंचकावर उपस्थित होते सर्वप्रथम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भगवान गरुडे यांनी केले राज्यशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या अंतर्गत शैक्षणिक सत्र 2022 23 मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे याविषयीची माहिती दिली. 

    यामध्ये विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा.उमेश दैवे म्हणाले की आज भारतातील प्रत्येक नागरिकाला राज्यशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्यामुळेच आपल्याला इतर देशांचे संविधान व भारतीय संविधान  याची जाण होते आणि त्या माध्यमातून भारताचा सुजाण नागरिक हा घडत असतो याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम  म्हणाले की आज राज्यशास्त्र हे संपूर्ण मानवी जीवनाचा आवश्यक भाग बनले आहे कारण मनुष्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात राजकारणाने प्रवेश केला आहे राजकारण ही हयात भर आणि निरंतर अशी प्रक्रिया बनली आहे त्यामुळे व्यक्तीला सकारात्मक दृष्टी प्राप्त होत असते राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे व्यक्तीला नुसते अधिकाराचीच नाही तर नागरिकांच्या कर्तव्याची सुद्धा जाणीव होते कारण अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून राज्यशास्त्राचे अध्ययन सर्वांनी केले पाहिजे. 

    याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. नितीन जाधव डॉ. गोविंद गायकी डॉ. गजानन वानखेडे यांनीही आपले विचार मांडले या कार्यक्रमाच्या वेळेस राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव ,व सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किरण चौधरी हिने तर आभार प्रदर्शन वैष्णवी मोदी यांनी केले कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी आणि असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

Powered by Blogger.