Breaking News
recent

सुपारी घेवुन मर्डर करणारे खुंखार गुन्हेगाराला पकडण्यात यश

 मलकापुर शहर डी. बी. पथकाची दमदार कामगीरी  


मलकापूर:- पोलीस स्टेशन खांदेश्वर नवी मुंबई येथे कलम ३०२ भा.द.वि.प्रमाणे सदर पो.स्टे.ला गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची हकिकत अशा प्रकारे आहे की, गुन्ह्यातील मयत स्त्रीच्या पतीचे एका महीले सोबत विवाहबाह्य प्रेम संबंध होते व त्यांना एकत्र राहायचे होते. मात्र त्यांना गुन्ह्यातील मयत अडसर ठरत होती.

 त्यामुळे प्रियकराच्या पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रियसीने प्रियकराच्या पत्नीला जिवेठार मारण्यासाठी आरोपी नामे १) रोहीत राजु सोनोने, वय २२ वर्ष, रा. शिवाजी नगर, मलकापुर, ता. मलकापुर, जि. बुलढाणा, २) पंकज नरेंद्रकुमार यादव, वय २६ वर्ष, रा. जोनपुर उत्तर प्रदेश, ३) दिपक दिनकर चोखंडे, वय २५ वर्ष, रा. बेलाड, ता. मलकापुर, जि. बुलढाणा यांना संपर्क करुन त्यांना ३ लाखाची सुपारी दिली आहे. सदर सुपारी पैकी २ लाख रुपयाची रोकड आरोपीतांनी प्रियसीकडुन स्विकारली आहे. त्यानंतर दिनांक १६/०९/२०२२ रोजी आरोपीतांनी भरवस्तीत मयत पत्नीस गाठुन तिचे गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिचा गळा चिरुन तिस जिवेठार मारले आहे. 

त्यावरुन सुपारी घेवुन मर्डर करणा-या आरोपीतांचे शोधकामी आज दिनांक १८/९/२०२२ रोजी सकाळी मुंबई पोलीसांची टिप मलकापुर शहर पो.स्टे. ला आल्यावर त्यांनी आरोपी तपासकामी पो.स्टे.ला मदत मागीतल्यावर पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया (भा.पो.से.), अपर पोलीस अधि श्रवण दत्त (भा.पो.से.), उप विभागीय पो. अधिकारी अभिनव त्यागी (भा.पो.से.) व ठाणेदार विजयसिंग राजपुत यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार तिन्ही आरोपीतांचा शोध घेणेकामी पो.स्टे.डी.बी. पथकाचे स.पो.नि.सुखदेव भोरकडे, पो. का. संतोष कुमावत, पो.का. प्रमोद राठोड, पो. का. अनिल डागोर, पो. का. ईश्वर वाघ, पो. का. सलिम बर्डे असे मुंबई पोलीसांचे टिमसह आरोपी शोध कामी रवाना होवुन दिवसभराचे अथक प्रयत्नानंतर बेलाङ फाटा मलकापुर, ता. मलकापुर येथुन वरील तिन्ही आरोपीतांचा सिने स्टाईलने पाठलाग करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. व पुढील कारवाई कामी मुंबई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.


Powered by Blogger.