Breaking News
recent

आलेवाडीत ४५ वर्षीय महिलेच्या घरात घुसुन विनयभंग आरोपी अटक व न्यायलयीन कोठडी



मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर 

संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा पोस्टे हद्दीतील ग्राम आलेवाडी येथील  एका ४५ वर्षीय  महिलेच्या दरवाजा बंद असलेल्या घरात रात्री २ वाजता अनधिकृत प्रवेश करुन विनयभंग केल्याची घटना दि १६ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता घडली  या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे तालुक्यातील आलेवाडी येथील ४५ वर्षीय महिला दरवाजा बंद करुन घरात झोपलेली असतांना आरोपी ईस्त्राइल निकंदर मासरे रा आलेवाडी याने सदर महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करुन महिलेचा विनयभंग केला तसेच हाताच्या दंडाला चावा घेतला आरडा ओरड केल्यास चाकुने जिवे मारण्याची धमकी दिली 

सोनाळा पोस्टेला सदर पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी ईस्त्राइल निकंदर मासरे रा आलेवाडी याच्या विरुद्ध सोनाळा पोलीसांनी कलम ३५४ , ३५४ (अ) ४५२ , ३२४ , ५०६ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात बीट जमदार सैय्यद मोईनोद्दीन पुढील तपास करित आहे

Powered by Blogger.