स्वराज्य-गुरुकुल शिक्षक समुहाकडून साहित्यिक रज्जाक शेख सन्मानित
प्रतिनिधी
स्वराज्य गुरुकुल शिक्षक समुहाच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. तालुकास्तरीय सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कवी,गझलकार तथा जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्याचे सहसंपादक साहित्यिक रज्जाक शेख यांना साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.यावेळी पोलीस अधिकारी संदिप मिटके ,साहित्यिक डॉ.संजय कळमकर ,जिल्हा उपशिक्षणाधिकारी रमजानखान पठाण ,श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,जिल्हा उर्दू शिक्षक समितीचे इमाम सय्यद,नसीर सय्यद, रवी वाघ,कल्पना बाविस्कर, अनिल ओहळ,प्रल्हाद साळुंके, सुनील बागुल आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत.शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या बाराशेपेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता, लेख, हायकू, अभंग, प्रेमकविता, गझल, काव्यांजली, अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता,कथा ,लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे.आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत सत्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन ,श्रीरामपूर तसेच औरंगाबाद येथील कविसंमेलनाचे ते माजी संमेलनाध्यक्ष आहेत.साहीत्य सन्मान निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.