Breaking News
recent

तहसिलदार वरणगावकरच्या अपशब्दामुळे तलाठी,मंडळ अधिकारी संपावर,कारवाई ची मांगणी



मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर

   संग्रामपुर तालुक्यातिल तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर अपशब्दामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत.तहसिलदार वरणगावकर हे जनतेसमोर तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.मानसिक त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण करत आहेत.त्यामुळे तहसिलदार वरणगावकर अपमानास्पद वागणूक देत असल्याने मंडळ अधिकार्‍यांसह तलाठ्यांनी सामूहिक रजा आंदोलन छेडले आहे. तहसिलदार वरणगावकर हे अपशब्द बोलून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघाने केला आहे.

  त्यामुळे संघाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन मंडळ अधिकारी व तलाठी संपावर निघाले आहेत. त्याच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत संप सुरुच राहणार असे निवेदनात नमूद केले आहे.माहूर तहसिल कार्यालयात असतांनाही तेथील तलाठी व कर्मचार्‍याशी सुद्धा अपशब्द वापरत होते.असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर मंडळ अधिकारी चामलाटे,राऊत,तलाठी विनोद भिसे, देविसाद जाधव, रंगदळ, गाडे, कुसळकर, पागोरे ,चव्हाण, खेडकर, जगताप, कस्तुरे, पालकर, डाबरे, बोडखे, नलावडे यांच्या सह तलाठ्याचे  स्वाक्षरी आहेत.

 माझ्या कडून माझ्या हाता खाली काम करत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी अशी वागणुक मि केलेली नाही. हा कोणाचा तरी गैरसमज असावा. सर्व जनतेच रक्षण करने व कायदा सुव्यवस्था सांभाळणे हे आमचे कर्तव्य आहे._सिद्धेश्वर वरणगावकर तहसिलदार संग्रामपुर


Powered by Blogger.