मध्य रेल्वच्या सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
मलकापूर दि. २२ सप्टेंबर मध्ये रेल्वेच्या सेवा सप्ताह निमित्त येथील गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतिने मलकापूर रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता करून जनजागृती करण्यात आली. यावेळी स्टेशन प्रबंधक डी.व्ही.ठाकुर,सी.जी.राजपूत साहेब, संतोष गीरी, अक्षय रायकर, ए.एन.शेख, पी.एस.बारजीभे यांच्यासह सर्व अधिकार तथा कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. विद्यार्थ्यांना स्वच्छता व प्लास्टीक वस्तू वापराबाबत शपथ ग्रहण केली. दरम्यान सी.जी.राजपूत यांनी विद्यार्थ्यांना रेल्वे विभाकगाच्या तांत्रिक कार्यपद्धतीची माहिती दिली.
या स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांसोबत गोविंद विष्णू महाजन विद्यालयाचे प्रा.सौ.ममता पांडे, प्रा. विजय पुंडे, प्रा.सुधाकर ईंगळे, प्रा.डाॅ नितीन भुजबळ, विजय पाटील आदींनी सभाग घेतला.