Breaking News
recent

गणेशोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गाने पोलिसांचे पथसंचलन



 प्रतिनिधी प्रमोद हिवराळे 

नांदुरा गणेशोत्सव व आगामी इतर उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्ताची जय्यत तयारी केली असून शहरातील पेठ मोहल्ला, कुरेशी मस्जिद, सायकलपुरा, जैन यांचे घर, भावसार देवी मंदिर, जामा मस्जिद, दरबार गली, अंबा देवी गड, किसान चौक, मोतीपुरा मस्जिद जवळून जिजामाता चौक, ध्रुव चौक, राम किराणा, चावडी चौक, जनता चौक, मिहाणी चौक, घास मंडी, मच्छी मार्केट, छोटी मस्जिद आदी भागांतून प्रो पोलीस उपअधीक्षक खाडे मॅडम, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले.

या पथसंचलनात ८ दुय्यम पोलीस अधिकारी, अंमलदार ३०, बुलढाणा येथील मुख्यालयातील स्ट्रायकिंग फोर्स, दंगा काबू पथक मलकापूर, प्रशिक्षणार्थी एल पी सी ५ गृहरक्षक दलाचे ३५ जवान यांच्यासह पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे ए एस आय राजपूत, रविकुमार राठोड, शैलेश बहादुरकर यांची उपस्थिती होती.

Powered by Blogger.