मातंग समाजाला नगर परिषद सातत्याने डीवचत आहे : गोपाल तायडे
माघील वर्षी 28 जुलै 2021 रोजी स्वाभिमानी वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरण करण्यात यावे करीता आमरण उपोषण करण्यात आले होते.सलग तीन दिवस उपोषण केल्या नंतर उपोषणाची दखल घेऊन नगर परिषदे कडून स्मारक सौंदर्यीकरनाला प्रशासकीय मान्यता देऊन तश्या प्रकारचे लेखी पत्र त्कालीन मुख्यअधिकारी शेळके याच्या हस्ते उपोषण कर्त्यांना देण्यात आले त्यामधील नमूद मजकूर असा की लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक सौदरीकरनाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.परंतु सप्टेंबर 2022 मध्ये नगर परिषदेला शहर विकास कामाकरिता सहा कोटी रुपये मंजूर झाले असून सुद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक हेतूपुरस्पर वेगळण्यात आले असल्याचे.वृतपत्रा मधून कळते या मुळे मातंग समाजाचे मोठया प्रमाणात भावना दुखावल्या आहेत.
नगर परिषदे कडून याही अगोदर अनेक वेळा मातंग समाजाचे भावना दुखावल्याचे अनेक उधारणे आहेत 1993 च्या आगोदर पासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक शेगाव शहरांत अस्थिवात असून सुद्धा हे स्मारक अजून पर्यंत उपेक्षितच आहे. अण्णा भाऊ साठे हे मातंग समाजाचे आराद्य दैवत आहे. देशाचे नाव साता समूद्रा पार पोहचविण्याचे काम त्यानी आपल्या लेखनीतून केले आहे. त्यांच्या लेखणीणे समाज जागृतीचे काम केले आहे. तेरा कथा संग्रह, दोन नाटके, चौदा लोकांनाटके,पस्तीस कादंबऱ्या, दहा पोवाळे, कदाबरीवर आधारित सात चित्रपट, एक शाहीर, हे पुस्तक, आणि एक रशियाच्या प्रवासाचे प्रवासवर्णन, अशी विपुल शब्द संपदा अण्णा भाऊंच्या नावावर आहे. त्यांचे काव्यलेखन पोवाळे, लावल्या, गिते, पदे, छक्कळ,, गाणी, सवाल -जबाब, वर्णनपर आणि भाष्यात्मक निवेदनपर पद्धतीची, त्यांच्या विविध लोकांनाटयात आणि अन्य ठिकाणी विखुरलेली होती.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वड:माय हा 1183 पृष्टाचा ग्रंथ, प्रस्तावनेह 1998 ला प्रसिद्ध करून, अण्णाभाऊचे लेखन व त्यांची माहिती अभ्यासक आणि रसिकांना एकत्र उपलबध करून दिले.स्वातंत्र्य भारताची चळवळ,गोवा मुक्ती संग्राम चळवळ तसेच सयुक्त महारष्ट्रातील चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता अश्या थोर महापुरषाचे स्मारक शेगाव शहरात सौंदर्यीकर होत नाही हे खुप दुर्दैवी आहे. नगर परिषद प्रशासन महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहते का.? का कोणच्या सांगण्यावरून स्मारक सौंदर्यीकरण वेगळण्यात आले का.? हा आता संशोधनाचा भाग झाला आहे. असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला आहे. शहर विकासा करीता मंजूर झालेल्या निधी मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे सौदरिकारण करण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करू .