स्वाभीमानीच्या प्रयत्नाला यश !वंचित लाभार्थ्यांना मिळणार आता हक्काची घरे.
प्रतिनिधी
संग्रामपूर प्रधानमंत्री आवास योजनेतील जिल्ह्यातील सर्वेक्षणातून वगळलेल्या गरजु घरकुल लाभार्थ्यांची यादी पं.स.ने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली असल्याने स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या प्रयत्नामुळे संग्रामपूर तालुक्यातील ८७९९, तर जळगाव तालुक्यातील ६८५६, यांच्या सह जिल्ह्यातील वंचित घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ६०० गरजु घरकुल लाभार्थी प्र पत्र ड यादितुन तांत्रीक किंवा अन्य कारणांमुळे वगळले असल्याने प्रशासना विरोधात प्रचंड रोष व्यक्त होत होता.
त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. यामधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात प्रशासनाच्या विरोधात अनेक ठिकाणी धरणे आंदोलने उपोषणे केली, १५ व १६ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती समोर शेकडो लाभार्थ्यांनी उपोषण केले होते, त्यातच स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी १० हजार गरजु घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेटी देऊन पातुर्डा येथे घरकुल लाभार्थ्यांचा भव्य दिव्य रणसंग्राम मेळावा घेत त्यातुनच प्रशासनाला धारेवर धरत चांगलाच हादरा दिला होता.
या मागणीसाठी पंचायत समिती पासुन ते मुंबई ग्राम विकास विभागाचे अधिकारी यांची ६ एप्रिल रोजी भेट घेऊन सतत पाठपुरावा केल्यानंतर राज्य व्यवस्थापन कक्ष -ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य उपसंचालक मंजिरी टकले यांनी ३ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे इतर संवर्गातील पात्र कुटुंबाची माहिती मागविण्यात आली होती. अखेर जिल्ह्यातील सर्वेक्षणातून वगळलेल्या गरजु घरकुल लाभार्थ्यांची यादी पं.स.ने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली असल्याने यामधे संग्रामपूर तालुक्यातील ८७९९, तर जळगाव जा.तालुक्यातील ६८५६, यांच्या सह जिल्ह्यातील वंचित घरकुल लाभार्थ्यांना स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रयत्नामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.