खामगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न
नांदुरा प्रतिनिधी
लॉयन्स क्लब ज्ञानगंगा नांदुरा च्या वतीने (भारतीय डाक) खामगाव पोस्ट ऑफिस येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी खामगाव पोस्ट ऑफिस येथे लायन्स क्लब ज्ञानदा नांदुरा च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, यामध्ये बीपी, शुगर, ब्लड चेकअप शिबिर घेण्यात आले तसेच मरणोत्तर देहदान नेत्रदान व लायन्स क्लब ज्ञानगंगा च्या वतीने घेण्यात येणारे .
सामाजीक उपक्रमाबद्दल क्लबचे अध्यक्ष लॉ.अनंत वडोदे यांनी माहिती दिली,आपले आरोग्य निरोगी कसे ठेवावे याबद्दल लॉ.डॉ.सतीश हरगुनाणी यांनी मार्गदर्शन केले, क्लबच्यावतीने लॉ.डॉ.सागर अग्रवाल यांनी पोस्ट ऑफिस खामगाव चे आभार मानले, कार्यक्रम संपन्न करिता अक्षय सुलताने आणि हिवराळे साहेब यांनी विशेष सहकार्य केले, शिबीरामध्ये एकूण 65 शिबिरार्थी यांची आरोग्य तपासणी झाली