गावाच्या सुरक्षेसाठी रात्रभर देतात गल्लोगल्लीत सुरक्षा बोरगाव वसू येथील तरूणांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली. तालुक्यातील बोरगांव वसू येथे गेल्या महिन्याभरापासून गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामूळे गावातील तरुणांनी स्वयमस्फूर्तीने आपल्या गावाची सुरक्षा आपल्याच हाती असा आगळा वेगळा धाडशी उपक्रम हाती घेवून दररोज रात्रीच्या वेळात गल्लोगल्लीत पहारा देत आहेत. बोरगाव वसू हे गाव चिखली शहरा पासून काही अंतरावर असून गावाची लोकसंख्या दीड हजाराच्या जवळपास आहे. गावाची जमीन चांगली असल्याने सर्वांच्या शेतीचे उत्पन्न चांगल्या प्रमाणावर असून प्रत्येकांनी चांगली घरे सुध्दा बाधली आहेत. त्यामुळे गावात लहान मोठ्या चोऱ्या वाढल्या असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठे भितीने वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे येथील आहे. तरुणांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या गावाची सुरक्षा आपल्याच हाती असा निर्णय हाती घेवून पोलीस यंत्रनेवरील ताण कमी करण्यासाठी तरुणांनी २७ ऑगस्ट पासून दररोज सहा जणांचा एक ग्रुप तयार करून हातामध्ये काड्या शिट्टी वाजवत रात्री १० ते सकाळी ५ वाजे पर्यंत गावाच्या गल्लोगल्लीत व चौकाचौकात उभे राहून गावकऱ्यांचे रक्षण करीत आहेत. त्यामुळे गावातील भीतीचे घबराटीचे वावरण बऱ्यापैकी कमी झाले गावातील लोक शांततने झोप घेत आहेत. महिला व तरुण मुली यांच्यामधील भीतीही कमी झाली
यामध्ये सहभागी झालेले गावातील पत्रकार कैलास इंगळे,पत्रकार मयूर मोरे, बाबुलाल छर्रे, हरसिंग छर्रे हुन हिरीवाले, रशीद गोचीवाले, विनोद इंगळे, आदींचा समावेश आहे. अशा या उपक्रमाचे गावस्तरातून कौतूक होत आहे.