Breaking News
recent

जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा,भोकर येथे गुणवंतांचा सत्कार



प्रतिनिधी/भरत जोगदंडे

चिखली:- दि.३० आॅगस्ट २०२२ रोजी वै.भगवान संपत नेवरे(माजी सरपंच, ग्रा. पं. भोकर) यांचे स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थींना बक्षीस समारंभ पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चालना देणे, या उद्देशाने वै भगवान संपत नेवरे यांचे सुपुत्र सुभाष नेवरे आणि  रघुनाथ नेवरे (वनपरिक्षेत्र अधिकारी,बुलढाणा) यांनी ही संकल्पना राबवून अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला, त्याबद्दल सर्वांच्या कौतुकास ते पात्र ठरले. सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भागवत नेवरे(सरपंच,ग्रा पं भोकर), प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर काळे(जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाश सपकाळ (गट समन्वयक तथा केंद्र प्रमुख) भरत जोगदंडे(उपसरपंच, ग्रा पं गोदरी),प्रशांतभैया डोंगरदिवे (राष्ट्रवादी काँग्रेस नेता), श्रीकृष्ण फोलाने (शा व्य समिती, अध्यक्ष), मोहन देवकर (शा व्य समिती,सदस्य), बबनराव नेवरे (तंटा मुक्ती समिती अध्यक्ष,भोकर) हे लाभले.. मागील शैक्षणिक सत्रात प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

 यावेळी मान्यवरांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेचे योगदान याचे विवेचन करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक-कुळकर्णी सर (मुख्याध्यापक), परिहार सर, आंभोरे मॅडम,लव्हाळे सर, गव्हाणे सर,जाधव सर यांनी मेहनत घेतली.सदर कार्यक्रमासाठी बाळू गव्हाणे सर यांनी अतिशय सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद जाधव सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संतोष लव्हाळे सर यांनी केले.

Powered by Blogger.