भा. रा. काँग्रेसचे युवा नेते शुभम ढवळे यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
नांदुरा प्रतिनिधी :
नांदुरा शहरातील युवा नेते शुभम ढवळे यांनी नुकताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला शुभम ढवळे हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये शाखा अध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष पर्यंत कार्य केले परंतु शुभम ढवळे यांना त्यांच्या कार्याची पावती न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला शुभम ढवळे यांचा प्रवेश शिंदे गटाच्या शेगाव येथील जिल्हा बैठकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख शांताराम दाने, उपजिल्हाप्रमुख संतोष डीवरे, शिवसेना नेते रमेश पाटील, शहरप्रमुख अनिल जांगळे, युवा सेना शहर प्रमुख राज सुसरे यांच्या मार्गदर्शनामध्ये शेगाव येथील जाहीर प्रवेश करण्यात आला सदर कार्यक्रमाला असंख्य शिवसैनिक हजर होते.