गौरींचे घरोघरी आगमन
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यात महालक्ष्मीच्या उत्सवाची परंपरा जपली जात आहे. आज ३ सप्टेंबर रोजी गौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सण, उत्सवावर निर्बंध आले होते. परंतु गौरीचा हा उत्सव घरात साजरा होत असल्याने अडीच दिवसांच्या या उत्सवाची परंपरा कोरोना काळातही जपली गेली. मलकापूर व नांदुरा तालुक्यात घरोघरी गौरीपूजन केले जाते. भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात केले जाते.
शास्त्रानुसार, गौरी ही गणपती आई आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण समजली जाते. गणरायांचे आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गणरायांचे आगमनानंतर वेध लागतात ते गौरी आगमनाचे. यंदा या उत्सवाला ३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सजावटीसाठी लागणारे साहित्य, गौरीचे मुखवटे, साडी-चोळी, साजशृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांनी गर्दी केली होती. काहींनी महालक्ष्मीच्या मूर्तीचीही खरेदी केली. ३ सप्टेंबरपासून या उत्सवाला सुरुवात गौरी म्हणजे महालक्ष्मीला आवाहन होत आहे. महिलांमध्ये या गौरी सणानिमित्त आठवडी बाजारात साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती.