कुलरचा शाॅक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
श्रीकांत हिवाळे प्रतिनिधी
नांदुरा तालुक्यातील ग्राम काटी येथील पंचवीस वर्षीय तरुणाचा कुलरचा शाॅक लागुन मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की काटी येथील गुलाबसीग मानसींग चव्हाण वय २५ वर्षे हा तरूण दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान कुलर चालू करते वेळी कुलरचा जबर शाॅक लागला. नातेवाईकांनी त्यांला उपचारार्थ मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुलाब चव्हाण हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. मृत्यू मुळे काटी येथे शोककळा पसरली आहे.