Breaking News
recent

माऊली पेट्रोलियम चा उद्घाटन सोहळा संपन्न



मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

        आज सकाळी देऊळगाव माळी मोठ्या थाटात संपन्न झाला उद्घाटक म्हणून या भागाचे लोकनेते आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर व सत्यजित परिवाराचे सर्वेसर्वा शामभाऊ उमाळकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले येथे माऊली पेट्रोलियम चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला

  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच किशोर भाऊ गाभणे हे होते तर प्रमुख उपस्थितीत आमदार डॉक्टर संजय रायमुलकर सत्यजित परिवाराचे सर्व श्याम भाऊ उमाळकर जिल्हा परिषद चे माजी सभापती केशवराव जागृत जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे माजी जिल्हा परिषद सदस्य मनीष शेळके ग्रामपंचायत सदस्य भारत बापू मगर वरळीचे सरपंच डॉक्टर भुजंग राव गारोळे नागझरीचे सरपंच राजूभाऊ देवकर कळंबेश्वर चे सरपंच विष्णू भाऊ मगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी भाऊ जाधव युवा सेनेचे नीरज भाऊ रायमुलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 यावेळी प्रास्ताविक केशवराव जागृत यांनी केले यावेळी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर शाम भाऊ माळकर यांचे समायोजित भाषणे झालीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन मगर यांनी केलेले या कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Powered by Blogger.