सुहाना मसाला कंपनी यांच्या माध्यमातून भांडगाव ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ओपन जिम उद्घाटन सोहळा संपन्न.
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - दौंड तालुक्यातील औद्योगिक पट्ट्यातील नावारूपाला आलेले गाव व सर्व सुख-सुविधा जसे की शैक्षणिक, रोजगार ,दळणवळण, सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असलेल्या भांडगाव परिसरामध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सुहाना (प्रवीण) मसाले कंपनी भांडगाव यांच्या माध्यमातून ओपन जिम संकल्पना काल कार्यान्वित करण्यात आली.
सुहाना मसाले कंपनीचे चेअरमन राजकुमार हुकुमचंद चोरडिया यांच्या हस्ते ओपन जिमचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व थोडक्यात माहिती देताना दौंड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे यांनी सांगितले की भांडगावच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये इतर सुविधांसाठी नेहमीच या भागातील सुहाना कंपनी व इतर सर्व कंपन्या सढळ हाताने मदत करत असतात. आज संपूर्ण गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले असून संपूर्ण भांडगाव हे गटारमुक्त झाले आहे. पाच कोटी रुपयांचे पाणी योजना माटोबा तलाव ते भांडगाव कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
सुहाना कंपनीतील कामगार पहाटे व रात्री अंधारामध्ये पुणे सोलापूर हायवेने चालत प्रवास करत असतात त्यासाठी सुहाना कंपनी ते भांडगाव लाईटची सुविधा कंपनीने उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळेस नितीन दोरगे यांनी केले. त्याचप्रमाणे मा.सभापती मधुकर दोरगे यांनी चोरडिया यांची आभार मानत भांडगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क संकल्पना लवकरच राबवत असून यामध्येदेखील या भागातील कंपन्यांनी सढळ हाताने मदत करावी अशी विनंती केली. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी ओपन जिम संकल्पनेचे स्वागत करत असताना सांगितले की दौंड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ओपन जिम संकल्पना राबवणे आरोग्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे त्याचप्रमाणे गावातील तरुणांनी राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे मोठमोठे राजकीय पुढारी गावात येऊन फक्त राजकारण करत असतात त्यामुळे आमच्यासारख्यांचे न ऐकता सर्वांनी एकत्र येत गावाचा विकास साधला पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुहाना मसाला कंपनीचे चेअरमन राजकुमार चोरडिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुहाना कंपनीच्या प्रगतीमध्ये स्थानिक ग्रामस्थ कामगार यांचे श्रेय मोठे असून भांडगाव परिसराच्या प्रगतीसाठी सुहाना ग्रुप हा नेहमीच अग्रस्थानी असेल व 1984 मध्ये सुरू झालेला प्रवीण मसाले कंपनी ग्रुप आज मोठ्या नावारूपाला आलेला आहे. जुन्या गोष्टींना उजाळा देत चोरडिया यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,भांडगाव ग्रामपंचायतचे सरपंच संतोष दोरगे, विद्यमान ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणदादा काटकर, उपसरपंच सिंधुताई हरपळे, ग्रामपंचायत सदस्य सुनंदाताई गायकवाड ,रूपालीताई खळदकर, तुषार शेंडगे, नीलमताई दोरगे, नंदाताई जाधव, सदाशिव दोरगे, दौंड काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे , समता परिषद कार्याध्यक्ष मंगेश रायकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राहुल दोरगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित दोरगे यांनी केले.