जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची अडगांव बु.।। ला भेट
अडगांव बु.सेवा पंधरवडा या अनुषंगाने अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा व तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय दवाखाना येथे भेट दिली.या वेळी सरपंच सौ.शोभाताई खंडारे व पं. स.सभापती सौ.उज्जवलाताई काळपांडे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.ग्रा.प.नोंदणी बाबत विचारपूस करण्यात आली.पशुवैद्यकीय दवाखान्यात जाउन गुरांच्या लंपी आजारा बाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडुन माहिती घेण्यात आली.व ग्रामस्थानी आपल्या तक्रारी चे निवेदने सुध्दा जिल्हाधिकारी यांच्या कडे दिलीत.
या वेळी सरपंच, गटनेता, उपसरपंच,ग्रा.प सदस्यगण,माजी जि.प.सदस्य, तेल्हारा पं.स.सभापती,पत्रकार, ग्रा.पं.कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.