विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या शिक्षकाला त्वरित अटक करा
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - न्यू इंग्लिश स्कूल खामगाव , या शाळेमध्ये (ता. २१) इयत्ता ८वि मध्ये शिकणारा विद्यार्धी अक्षय बजरंग गवई (वय १३) या विद्यार्थ्याला हिंदी विषय शिक्षक सूर्यभान किसन चत्तर यांनी दोन दिवसामध्ये तीन वेळा जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली . त्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यावर विद्यार्थ्याला झालेली मारहाण पाठिवर उठलेले वळ व शिक्षकाने केलेली जातीवाचक शिवीगाळ पालक बजरंग गवई यांनी समजल्यानंतर त्यांनी यवत पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार दिली व शिक्षक सूर्यभान किसन चत्तर यांच्या वर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला .
ही घटना समजल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते उत्तम गायकवाड यांनी गवई यांच्या घरी भेट देऊन प्रकरणाची गंभीरता जाणून घेतली त्या नंन्तर त्यांनी विद्यार्थ्याला जबर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या शिक्षक सूर्यभान किसन चत्तर याला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे . तसेस मुख्याध्यापक नेवसे संस्था संचालक अध्यक्ष व सचिव यांच्यावर देखील कडक कारवाई करा असे निवेदन यवत पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे . या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते उत्तम गायकवाड ,नीतीन कांबळे , रोहित कांबळे बजरंग गवई ,किरण काळे , सचिन धेंडे , सलीम शेख व कार्यकर्ते उपस्थित होते .