मलकापूर नगराचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव दिनांक ३० सप्टेंबर शुक्रवारला
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर नगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला ठीक ६:१५ वाजता परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार सभागृहा समोरील प्रांगणात संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री नामदेवराव पाटील तसेच प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांतमंत्री मा. श्री गोविंदजी शेंडे यांचे मार्गदर्शन लागणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व स्वयंसेवक बंधू तथा नगरातील माता- भगिनी व नागरिक सहकुटुंब उपस्थित राहून संघ प्रेम व्यक्त करावे असे आव्हान तालुका संघचालक विनायकराव पाटील व नगर संघचालक श्री दामोदरजी लखानी यांनी केले आहे.