अनिल खंदारे यांच्या कार्याची पावती मिळाली -किसनराव मोरे
मंठा/प्रतिनिधी, शिवाजी खंदारे
अनिल खंदारे यांनी मागील वीस वर्ष्याच्या पत्रकारितेत समाजातील सोषित, वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची पावती प्रेस काउन्सील ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कार्यअध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांना मिळाली आहे, आत्ता समाजिक प्रश्न हाताळण्या बरोबरच ते पत्रकाना न्याय मिळून देतील असं मत पंचायत समिती चे सदस्य किसनराव मोरे यांनी व्यक्त केले ,
मंठा येथील शासकीय विश्राम गृहात खंदारे यांचा सत्कार करतांना ते बोलत होते यावेळी जेष्ठ पत्रकार राजेश भुतेकर, रंजित बोराडे, शेतकरी नेते बाळासाहेब वांजोळकर, जगण दवणे, बाळासाहेब वैद्य ,संजय वाघमारे, रामा दहातोंडे, गजानन देशमुख,सुनिल खंदारे, विश्वानंबर काकडे, सह आदी उपस्थित होते