मलकापूर गणपती विसर्जनामध्ये मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
![]() |
नाचत असताना खिशातून मोबाईल काढून चोरांनी वर्दळीचा फायदा घेत काढला पळ |
मलकापूर:- गणपती विसर्जनामध्ये नाचत असताना अज्ञाताने खिशातून मोबाईल काढून पळून घेऊन गेल्याची घटना काल दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया, मलकापूर समोर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की माता महाकाली गणेश मंडळ मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना मिरवणूक स्टेट बँक ऑफ इंडिया मलकापूर समोर आले असता माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये विवो वाय 72 (5G) ठेवला होता. नाचता नाचता मी माझ्या खिशाला हात लावून पाहिला असता मला माझ्या खिशात मोबाईल दिसला नाही मी बाजूला पाहिले असता मला माझ्या शेजारी नाचताना दोन अनोळखी व्यक्ती मोबाइल घेऊन पळून जातांना दिसले. मी व माझा भाऊ यांचा सह त्या दोन व्यक्तींचा पाठलाग केला परंतु त्या दोन अनोळखी इसमाने वर्दळीचा फायदा घेऊन पळून गेले व आम्ही त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. तरी माझा विवो वाय 72 (5G) मोबाईल एसबीआय समोर दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान नाचताना माझ्या शेजारी असणाऱ्या अनोळखी व्यक्तीने वर्दळीचा फायदा घेऊन माझ्या खिशातून मोबाइल चोरून नेला आहे असे दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
याबाबत प्रकाश गणेश इटणारे वय 22 वर्ष रा. माता महाकाली नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सिंह ठाकुर यांनी केला तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गजानन सातव करीत आहे.