देऊळगाव माळी येथील शिव सावता गणपती मंडळाने दिले वंचीत मुलाना मिष्ठान्न भोजन
मेहकर प्रतिनिधी, शिवशंकर मगर
गणेश उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देतं हिवरा आश्रम येथील वंचीत मुलाना मिष्ठान्न भोजन देऊन आगळा वेगळा अनुकरणीय आदर्श, देऊळगाव माळी येथील शिव सावता गणेश मंडळाच्या वतीने कृती पातळीवर जोपसला आहे. झालेल्या लोकवर्गणीतुन इतर खर्चाला कात्री लावून, शक्य तेवढ्या पर्यावरण पूरक उपक्रमांना प्राधान्य देतं,, काही कृतिशील संदेश देण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हा तरुण वर्ग धडधड करत असल्याची प्रचिती विविधांगी उपक्रमातून प्रत्यवास येतं आहे. सर्व सदस्यांनी नित्यानंद सेवाप्रकल्पास भेट देऊन,, आपुलकीने मिष्ठान्न भोजन भरविले. मायेचा हात लेकरांच्या पाठीवरून फिरवत भविष्यात देखील सर्वांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुल फुलांची पाकळी देण्याचा संकल्प विषद केला.
आज योगा योगाने सचिन भाऊ मगर यांचा वाढदिवस देखील चिमुकल्यांनी साजरा केला. सर्व सदस्यांनी संवेदनांचा कृतिशील गहिवर प्रकट करून मानवतेचे प्रतल विस्तारित केले. नित्यानंद चे संचालक अनंत शेळके यांनी सर्वांचे आभार मानले