बुलढाणा आदिवासी महादेव कोळी जमात संघटनेची जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न
बुलडाणाअमोल बावस्कार
आज दिनांक ०४/०९/2022 ला निसर्गाच्या कुशीत प्रसिद्ध असलेल्या राजूर येथील महादेव मंदिरात बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या , बुलढाणा ,चिखली,मोताळा ,मलकापूर, नांदुरा ,जळगांव जामोद ,संग्रामपूर, खामगाव,शेगाव तालुक्यातील 60 समाज बांधवांनची बैठक होऊन त्यामध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात आले .१) १९७६ च्या क्षेत्र बंधन कायद्याच्या नुसार जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीला सुलभतेने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे .या साठो प्रयत्न करणे.२) हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव यांचा धुपेश्वर ते मंत्रालय पर्यंत पायी यात्रा करून मा मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देने. व समस्या सोडवण्यासाठी सांगणे ३) जिल्ह्यातील चिखली , मेहकर,बुलढाणा, मलकापूर,जळगांव जमोद ,खामगाव च्या विधानसभा सदस्यांनी जर येणाऱ्या काही दिवसात या समाजाच्या मागण्यांसाठी प्रयत्न न केल्यास येणाऱ्या निवडणूक मध्ये वेगळा विचार करावा .
४) अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी अधिकारी यांना सेवा निवृत्ती पर्यंत सेवेत ठेऊन सर्व लाभ द्यावेत बैठक मध्ये प्रामुख्याने श्री गणेशराव इंगळे ,श्री दशरथ लोणकर ,श्री भागवतराव इंगळे , श्री निलेश भाऊ जाधव, श्री चंद्रभान सोनुने श्री सुगदेव तायडे ,ज्ञानेश्वर खवले,मंगेश इंगळे,गंगाधर तायडे,अनंता तायडे,विशाल झालटे, नीना सपकाळ,उमेश जाधव ,अमोल धाडे, संदीप धाडे ,अक्षय खवले,अभिषेक सपकाळ,मधुकर तायडे,सखाराम तायडे,पांडुरंग सपकाळ,विजय इंगळे,विश्वास वाघ ,दगडुबा आंबेकर, बाबुराव सोनुने ,राजेंद्र झालटे ,संदीप वाघ ,समाधान वाघ,प्रमोद वाघ,साहेबराव वाघ,मंगेश देवकर,राजू जाधव,भगवान वाघ ,अमोल फोलाने, भास्कर सोनुने ,श्रीराम सोनुने ,ज्ञानेश्वर सोनुने ,के ,डी भोलवनकार , डिगंबर थेरोकर ,कैलास धाडे, महेश सपकाळ,राजेश सुरळकर, मधुकर तायडे ,सखाराम तायडे ,लखन सपकाळ ,वासुदेव सोनुने ,भारत सपकाळ,सदाशिव सपकाळ, संतोष ब्राह्मणदे ,संतोष गवळी,गजानन घुळे ,गजानन धाडे असे अनेक महादेव कोळी समाजाचे बांधव उपस्थित होते .