चार दिवसीय शिबिरात लम्पि आजाराच्या ५०९ जनावरांवर उपचार
मलकापूर प्रतिनिधी
तालुक्यातील जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी मलकापूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.सुभाष भोपळे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पशुसंवर्धन विभागाने तत्काळ दखल घेतली. जनावरांच्या तपासणी व उपचारासाठी चार दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ५०९ जनावरांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. तालुक्यातील आळंद, दुधलगाव, वाघूळ, भालेगाव, हिंगणा काझी येथील लम्पि आजाराने ग्रस्त जनावरांवर उपचार करण्यात आले. पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी २ वडजीचे डॉ. सोनवणे, पशुधन विकास अधिकारी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकत्सालय मलकापूरचे डॉ. गजानन भोळे, महेश चोपडे, फोपसे यांना तात्काळ माहिती दिल्याबरोबर त्यांनी सहकार्य केले. डॉ. वरद आनंदगावकर, डॉ. सारंग भस्मे, डॉ. हर्षल बावा, डॉ. अहेतेशाम शेख, डॉ. पियुष झोपे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. पशु संवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. बोरकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लोणे व गट विकास अधिकारी पं. स. मलकापूर उध्दवजी होळकर यांच्या मार्गदर्शनात हे चार दिवसीय शिबीर पार पडले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी
शिवसेनेचे महादेव पवार, नितीन गोसावी, गणेश ठाकूर, युवासेना उपतालुका प्रमुख गणेश सुशिर, शिवसेना शाखा प्रमुख प्रथमेश पाटील, युवासेना शाखा प्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शाखा सहसचिव श्रीकृष्ण पाटील, शिवसेना शाखा सचिव मयूर कोलते, अभय कोलते, विजय चांभारे, धीरज दाभाडे, किशोर चव्हाण, सुपदा ब्राम्हणे, सुधाकर दांडगे, मुरलीधर वानखेडे, पाटील, प्रथमेश कोलते, अजय इंगळे, तेजस घुले पाटिल, पंकज पाटील, निलेश भवरे, राजूभाऊ गायकवाड; संदीप खर्चे, संतोष भगत, रघुनाथ भगत, शिवाजी भगत, संजय भगत, राजेंद्र चांभारे, संदिप चांभारे, भागवत गावंडे, गोपाल भगत, अजित चांभारे, अभिषेक भगत, रोहन चांभारे, धनराज वराडे, शत्रुघ्न भगत, प्रमोद नाले, दत्तात्रय भगत, सुरेश भगत, मन्साराम भगत, रामराव लासुरकर, अरुण भगत, गोरव भगत व सर्व गावकरी मंडळीनी सहकार्य केले.
अशी आहेत लम्पिची लक्षणे
लम्पि स्किनरोग हा गोट पॉक्स विषाणू (देवी) लम्पि स्किन रोग विषाणूमुळे गाय व म्हैस वर्गात होतो. यामध्ये जनावरांना ताप येणे, शरीरावर घट स्वरूपाच्या गाठी येणे याशिवाय जनावरांच्या तोंडात, श्वसननलिकेत व घस्यात गाठी येतात. दूध देण्याचे प्रमाण कमी होणे, गाभण जनावर गर्भपात होणे, ओढ काम करणाऱ्या जनावरांची कार्य क्षमता कमी होणे असे लक्षणे दिसून आल्यानंतर पशुपालकांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती द्यावी. तसेच बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून अलग ठेवावे. निरोगी जनावरांना उपलब्ध करुन दिलेल्या गोट पॉक्स लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. लम्पि स्किनरोग हा गोट पॉक्स विषाणू (देवी) लम्पि स्किन रोग विषाणूमुळे गाय व म्हैस वर्गात होतो. यामध्ये जनावरांना ताप येणे, शरीरावर घट स्वरूपाच्या गाठी येणे याशिवाय जनावरांच्या तोंडात, श्वसननलिकेत व घस्यात गाठी येतात. दूध देण्याचे प्रमाण कमी होणे, गाभण जनावर गर्भपात होणे, ओढ काम करणाऱ्या जनावरांची कार्य क्षमता कमी होणे असे लक्षणे दिसून आल्यानंतर पशुपालकांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती द्यावी. तसेच बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून अलग ठेवावे. निरोगी जनावरांना उपलब्ध करुन दिलेल्या गोट पॉक्स लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.