Breaking News
recent

महाराष्ट्र नाभिक महामंडळ बुलढाणा तालुकाध्यक्षपदी रविंद्र सुर्यवंशी तर शहराध्यक्षापदी मंगेशभाऊ बिडवे यांची फेरनिवड



मोताळा (गणेश वाघ/प्रतिनिधी)

 दि.२४ सप्टेंबर रोजी संत सेना महाराज भवन या ठिकाणी कल्याणराव दळे, दामोधरकाका बिडवे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या आदेशावरून जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नाभिक महामंडळ बुलढाणा  तालुकाध्यक्षपदी रविंद्र रामभाऊ सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात तर मंगेशभाऊ दामोधररावजी बिडवे यांची बुलढाणा शहर अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारणी सदस्य गजानन झगरे, विभागीय उपाध्यक्ष अविनाशभाऊ भुतेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजातील जेष्ठ व तळमळीचे कार्यकर्ते रमेश वखरे होते, यावेळी जिल्हाअध्यक्ष माधवराव ससाणे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी सदर बैठकीला राजुभाऊ पांडे, पांडुरंग ओरपे, निलेश शिंदे, सचिन बिडवे, नरेंद्र भंडारी, बालाजी ढापसे, कृष्णा पंडीत, भरत पंडीत, कैलास काशिकर, भागवत रायकर, शाम झगरे  दिपक झगरे, रमेश जाधव ,संजय जाधव  मधुकर बिडकर यांनी सूचना केल्या तसेच तालुक्यातील व शहरातील समाज बांधव उपस्थित होते.

Powered by Blogger.