सादाला प्रतिसाद देत ५०२ रक्तदाते धावून आले त्या थॅलेसीमीयाग्रस्त चिमुकल्यांसाठी
नांदुराः आध्यात्मिक, राजकीय, वैद्यकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी समाजमाध्यमावरुन केलेले आवाहन, शहरात जागोजागी लागलेले माहितीचे डिजिटल बोर्ड,सोशल मीडीयावरील तुफान प्रचार, तसेच सर्वच वर्तमानपत्रांनी दिलेली ठळक प्रसिद्धी आणी गेल्या एक महिन्यापासून शिबीराच्या यशस्वीतेसाठी पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या चंद्रशेखर आझाद मंडळाच्या कार्यकर्त्यांना रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद देत त्या निरागस बालकांसाठी भरभरून रक्ताचे दान केले
थॅलेसीमीया या आजाराने बाधित शहर व तालुक्यातील १५चिमुकल्यांसाठी चंद्रशेखर आझाद मंडळाच्या वतीने ६सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
सर्वप्रथम या शिबीरात श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी, आमदार राजेश एकडे,बळीराम महाराज ढोले,ब्रम्हकुमारी सुलभादिदी यांच्या हस्ते विधीवत पूजन व माल्यार्पण करून उदघाटन करण्यात आले
या शिबीराची व्याप्ती आणी आवाका पाहता मंडळाच्या वतीने रक्तसंकलनासाठी अकोला येथील तीन रक्तपेढ्यांना आमंत्रित करण्यात आले होते ज्यामध्ये डॉ हेडगेवार रक्तपेढी ,डॉ बी पी ठाकरे मेमोरियल ब्लड सेंटर व साई जीवन रक्तपेढी यांचा समावेश होता तीनही रक्तपेढ्यांचे रक्त संक्रमण अधिकारी व त्यांची इतर सहकाऱ्यांची चमू उपस्थित होती
रक्तदान शिबीराला प्रारंभापासूनच रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत होता यात विशेष बाब म्हणजे शहर व तालुक्याच्या रक्तदान शिबीराच्या इतिहासात प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात महिला व युवतींनी घराबाहेर पडून त्या बालगोपालांसाठी रक्तदान केले शेवटी आई कोणाचीही असो आपल्या बाळाच दुख या जगात सर्वात जास्त तिला कळते .
शिबीरामध्ये श्री गुरुदेव सेवाश्रम,राष्ट्रधर्म युवा मंच,लॉयन्स क्लब ज्ञानगंगा,नांदुरा अर्बन बँक कर्मचारीवृंद,भारतीय ज्ञानपीठ हायस्कूलचे गुरुजन, पुंडलिक महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी, कोठारी विद्यालयाचे शिक्षक, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, आर्ट ऑफ लिव्हिंग, शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका,साई वैद्यकीय सेवा समीती,युवा ग्रुप,व्यापारी संघटना,एच डी एफ सी बँकेचे कर्मचारी, महालक्ष्मी ज्वेलर्सचा संपूर्ण स्टाफ शहर व तालुक्यातील गणेश मंडळे,दुर्गादेवी मंडळे,नवनाथ मंडळ निमगाव, शिवनेरी ग्रुप अलमपूर,प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी यांच्यासह विविध सेवाभावी सामाजिक संघटना ,युवकांनी नवतरुणांनी ,नागरीकांनी प्रचंड प्रमाणात सहभाग नोंदवला यात डॉ हेडगेवार रक्तपेढी-१४०,डॉ बी पी ठाकरे ब्लड सेंटर-१२०व साईजीवन रक्तपेढी-२४२ असे एकूण ५०२रक्तबॅगांचे संकलन झाले
छोट्या मुला-मुलींना लागणाऱ्या रक्तासाठी रक्तदात्यांचा माणुसकीचा महापूर यावेळी नांदुरेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला
【शिबीरातील ठळक बाबी 】
१)रक्तदान शिबीरात प्रथमच ७०महिला व युवतींनी रक्तदान केले
२)सर्वात पहिले रक्तदान करणारे ठरले विनायक महादेवराव शेजोळ तर ५०२वा नंबर लागला अजय दयाराम अढाव यांचा
३)फक्त रक्तदान करण्यासाठी मेहकर येथून गणेश नंदकिशोर राऊत व बोरगाव मंजू येथील मेघाताई देशमुख एवढ्या लांबून आले होते
४)अकोला थॅलेसीमीया सोसायटी व अंकुर सीडस प्रा लि नागपूर यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली
तर यश आईस्क्रीम पार्लर व टाकळकर पान शॉप यांच्याकडून रक्तदात्यांना सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले