Breaking News
recent

रेल्वे ट्रेन समोर येऊन येरळी येथील एक इसमाची आत्महत्या



नांदुरा प्रतिनिधी

नांदुरा :- दि.22.09.22 रोजी अंदाजे 09.30 वाजता km no 523 जवळ महाराष्ट्र एक्सप्रेस समोर येऊन एक इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस शेगाव चे सुनील कवळकर ,गजानन मेटांगे आर पी एफ झनके व ओमसाई फाउंडेशन चे विलास निंबोळकर ,पियुष मिहानी हे ऍम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी पोहचले.घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल मधील नंबर वरून मृतकाची ओळख पटवली .मृतक मुलगा हा येरळी येथील दिपक लक्ष्मण काकने वय 28 वर्ष  हा असल्याचे निष्पन्न झाले.लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगाव येथे मर्ग नंबर 30/22 कलम 174 सीआर पी सी प्रमाणे दाखल केला .घटनास्थळावरून वरून प्रेत ओमसाई फाउंडेशन च्या स्वयंसेवक यांनी ऍम्ब्युलन्स पर्यन्त आणून सरकारी दवाखाना नांदुरा येथे पोहचवले ओमसाई फाउंडेशन नांदुरा चे विलास निंबोळकर पियुष मिहानी ,श्रीकृष्ण वसोकार यांनी  लोहमार्ग पोलिसांना सदर कार्यवाहीत मदत केली .मृतकाच्या आत्महत्या बाबत पुढील तपास लोहमार्ग पोलीस सुनील कवळकर करीत आहेत.

Powered by Blogger.