आ. सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार 2022'
![]() |
सहाव्या माळेला पेठ येथील सौ. शोभाताई विजय सोमासे या कर्तृत्ववान नारीशक्तीचा सन्मान |
पेठ / मनोज जाधव
माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट, आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा नारीशक्तींचा म्हणजेच नवरात्रीत नऊ महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. आज सहाव्या माळेला पेठ येथील सौ. शोभाताई विजय सोमासे या कर्तृत्ववान नारीशक्तीचा साडी, चोळी, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सौ. शोभाताई विजय सोमासे यांचा परिचय
सौ. शोभाताई विजय सोमासे रा. पेठ ता. चिखली या गावातील सक्षम महिला असून त्यांनी शेती व शेतीबरोबर जोड व्यवसाय करून आपला मुलगा शंतनू विजय सोमासे या आपल्या मुलावर योग्य ते संस्कार करून हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करून, काबाडकष्टाने अविरत परिश्रम घेतले. यातूनच त्यांच्या मुलाने आच्या कष्टाच्या जाणीवेने बारावीच्या परीक्षेत 98 टक्के मार्क्स प्राप्त करून उत्तीर्ण झाला. तसेच शंतनू याने आपली परिस्थिती ओळखून कोणत्या प्रकरची शिकवणी न लावता नीट परीक्षा 2022 मध्ये 610 गुण प्राप्त केले. याच सोबत शंतनू याने CET परीक्षा 2022 मध्ये 99.95 इतके गुण प्राप्त केले. आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा सौ. शोभाताई विजय सोमासे यांचा आहे. शंतनू लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात M.B.B.S. साठी प्रवेश मिळवून आईचे स्वप्न साकार करणार आहे. शंतनूच्या यशासाठी त्याची आई सौ. शोभाताई विजय सोमासे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या समारंभासाठी सौ. सिंधुताई तायडे माजी सभापती पंचायत समिती, सौ. कांचनताई पाटील, श्रीमती सुनंदाताई शिनगारे माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ. मनीषाताई सपकाळ माजी पंचायत समिती सदस्य, सौ. नीताताई सोळंकी तालुका अध्यक्ष महिला किसान आघाडी, सरपंच विष्णूभाऊ शेळके, लिंबाजी पाटील शेळके, अंकुशराव तायडे, भगवान गायकवाड., मारोती तायडे, भगवान शेळके, तुकाराम शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष बबनभाऊ काकडे, संजय सोमाशे, विजय सोमासे, रामेश्वर पवार , रामेश्वर शेळके, भगवान शेळके, राजु शेळके, रमेश बोबडे, राजु पांढरे, विलास घाडगे, हिंमतराव सोमासे, अरुण सोमासे, मधुकर सोमासे, विष्णु सोमासे, कार्तिक सोमासे शत्रुघ्न शेळके, भरत शेळके, कदम महाराज, गजानन यादव, तुषार कदम, गणेश शेळके, राम शेळके, आकाश घाडगे, शिवाजी यादव, राम घाडगे, सुजित शेळके, शाम भांदर्गे उपस्थित होते.