आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कडून कन्यापूजन कार्यक्रम संपन्न
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा:- धार्मिक व सामाजिक संघटना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष प्रवीणभाई तोगडियाजी यांच्या आदेशाने भारतभर नवरात्र उत्सव मध्ये कन्या पूजन चंडीपाठ शस्त्र पूजन कार्यक्रम असे आयोजन केले जात आहे. विदर्भ महामंत्री किशोरजी दिकोंडवार, विदर्भ अध्यक्ष अनुपजी जयस्वाल, यांच्या आदेशाने राष्ट्रीय बजरंग दल जिल्हाध्यक्ष जीवनसिंग राजपूत यांचे नेतृत्वाखाली जिल्हाभर नवरात्र मध्ये शस्त्रपूजन कन्यापूजन चंडीपाठ यासारखे उपक्रम राबवत आहे.
आज जिल्हा परिषद शाळा फुली येथे राष्ट्रीय बजरंग दल शाखा फुलि यांच्याकडून कन्या पूजन कार्यक्रम घेण्यात आला, कन्याचं पूजन करून त्यांना जिलेबी केळी, असे अल्पोहर देवून कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चौधरी सर, शिक्षक शिक्षिका जिल्हाध्यक्ष जीवन सिंग राजपूत तालुका उपाध्यक्ष सचिन चोपडे शाखाध्यक्ष राजेश सरोदे, वैभव वावगे मंगेश सरोदे ज्ञानेश्वर सरोदे गणेश तायडे शुभम खोले आदित्य सरोदे सागर मुंडे निखिल सातव राजेश सरोदे राजकिरण सरोदे