दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी 5 टक्के निधीचे वाटप करण्यात यावे
मलकापूर प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी 5 टक्के निधीचे वाटप करण्यात यावे.लवकरच दिवाळी सण येणार आहेत. अशातच महागाई बेसुमार वाढली आहे त्याकरिता 5टक्के निधी हा येणाऱ्या 2,3 दिवसात वाटप करण्यात यावा साठी नगर पालिकेत दिव्यांगासाठी राखीव असलेला 5 टक्के निधीचे वाटप करण्यात यावा.
अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष निलेश चोपडे यांच्या मार्गदर्शना खाली उपमुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यावेळी उपस्थित दिव्यांग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे,सचिव शेख रईस,जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे, सहसचिव संतोष गणगे, कोषाध्यक्ष इरफान खान, सदस्य अंकित नेमाडे,रमेश नेमाडे, विवेक राजापुरे, प्रकाश वाघ इत्यादी सभासद उपस्थित होते.