Breaking News
recent

वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तास नुकसानभरपाई देण्याचे उच्च-न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश



ता. खानापुर-  वांग मराठवाडी धरणग्रस्त श्रीमती रत्नप्रभा तातोबा कांबळे आणि प्रदीप तातोबा कांबळे यांचे पुनर्वसन मु.पो.कार्वे (कांचनपूर), दालू तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी सुमारे १५ वर्षांपूर्वी झाले आहे. सन दोन हजार पाच साली राज्य शासनाने सदर धरणग्रस्त यांना शेतीसाठी सुमारे तीन एकर एवढी जमीन प्रदान केली होती. परंतु सदर जमीन पडीत व लागवडीखाली नसल्याने तसेच कोणत्याही प्रकारे सिंचनाची सुविधा नसल्याकारणाने काबाडकष्ट करूनही पाण्याअभावी सदर  धरणग्रस्तांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत असे. 

  शासन दरबारी हजारो हेलपाटे घालून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. म्हणून सदर धरणग्रस्त यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शेतीसाठी पाणी  लवकरात लवकर करुन देण्यासाठी  व जोपर्यंत पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत दरमहा नुकसानभरपाई मिळणेसाठी याचिका दाखल केली.  दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सदर प्रकरणी सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नुकसानभरपाईपोटि याचिकाकर्त्यांना  ऑक्टोबर महिन्यांकरिता  एका आठवड्यात रु.१५ हजार देण्याचे आदेश केले. सदर प्रकरणात राज्य शासनाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. याचिकाकर्त्यातर्फे अॅडव्होकेट गौतम कांचनपूरकर व अॅडव्होकेट   अभिजीत कंडारकर यांनी काम पाहिले.

Powered by Blogger.