Breaking News
recent

पीक विमा व दुष्काळ ५० हजार अनुदान मिळण्याकरता मुखमंत्री यांना निवेदन

प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणे गव्हाळ ता नांदुरा संपूर्ण नांदुरा तालुक्यामध्ये गेलेले चार महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सर्व पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के पिक विमा मिळावा व हेक्टरी 50 हजार रुपये दुष्काळी अनुदान मिळावे इतर मागण्यांकरिता चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले आहे

सदर निवेदन नमूद केले आहे परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सतत पाऊस चालू असल्यामुळे मका तूर कापूस अतोनात नुकसान झाले आहे हे सर्व पीक खराब झाली आहे वारंवार अर्ज देऊन सुद्धा प्रशासन जागी होत नाही शेतकऱ्यांना शंभर टक्के पिक विमा 2022 23 चा मिळवण्यात यावा दुष्काळी अनुदान हेक्टरी 50 हजार देण्यात यावे शेतकरी कुटुंब धारक रेशन कार्ड तून गहू व तांदूळ बंद करण्यात आले असून ते पूर्ण वर्त सुरू ठेवण्यात यावे तसेच या नांदुरा तालुक्याची नजर अंदाज आणेवारी पन्नास टक्क्यांच्या वर काढण्यात आली असून पिकांचे विकट परिस्थिती पाहता 45% पिक आणेवारी काढण्यात यावे व पीक विम्याचे कंपनीने सर्वे केलेले असून पिक विमा व दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे शेतकरी वर्गाला रेशनमार्फत गहू तांदूळ देण्यात यावी असे झाल्यास १५ दिवस दिवसानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन खेड्यात येईल असे म्हटले आहे

Powered by Blogger.