Breaking News
recent

रोजगार सेवकाचे तीन दिवशीय प्रशिक्षण नांदुरा येथे संपन्न


नांदुरा प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अभियानांतर्गत गांवानी भरभराट होण्यासाठी नांदुरा तालुक्यातील सर्व रोजगार सेवकाचे तीन दिवशीय प्रशिक्षण नांदुरा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते, प्रशिक्षणाचे उद्घाटन तहसीलदार मा.राहुल तायडे साहेब,गटविकास अधिकारी मा.समाधान वाघ साहेब याच्या हस्ते करण्यात आले होते.

खर्या अर्थाने गावाचा समृद्ध विकास करायचा असेल गावाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन नरेगाची कामे घेवुन गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो.गाव समृद्ध करण्यासाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवल्याच पाहिजे यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्या याबाबतही प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात आली.


सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक गटविकास अधिकारी मा.नारखडे साहेब,विस्तार अधिकारी मा.नेमाडे साहेब,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,श्री.गौरव खोडके,श्री.निलेश अवकाळे,प्रभारी कार्यक्रम अधिकारी श्री.विकास गायकवाड,तांञिक सहाय्यक अधिकारी श्री.गजानन बोदडे,तांञिक सहाय्यक कृषी अधिकारी श्री.नितिन मोटे,डाटा एन्टी ऑपरेटर श्री अमोल तांगडे,डाटा एन्टी ऑपरेटर तहसील श्री.मंगेश पाडव यांनी रोजगार सेवकांना प्रशिक्षण दिले.यावेळी,तालुक्यातील बहुसंख्य ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

Powered by Blogger.