आंतरराष्ट्रीय वडोदा शाळेतील मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद
मलकापूर प्रतिनिधी
जिल्हाधिकारी राममूर्ती बुलढाणा यांनी मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील शाळेला अचानक भेट दिली तसेच जिल्हाधिकारी यांनी शालेय पोषण आहाराची गुणवत्ता तपासून स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी वर्चुअल क्लासरूम मध्ये असलेल्या वर्ग चौथीतील सुरू अध्यापनाची पाहणी केली टीव्हीवर विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवून त्यावर प्रश्न विचारले व इंग्रजी वाक्यांचे वाचन घेतले वर्ग आठवा व सातवी मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत घेतली मुलाखतीत विद्यार्थी साहेबांना त्यांच्या बालपणात घेऊन गेले.
विद्याथ्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पाहून जिल्हाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला शाळेतील मुख्याध्यापक जितेंद्र राठी सर क्रीडा व गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी मुख्याध्यापक जितेंद्र राठी सर शिक्षक वृंद, गावकरी, शाळा समिती यांना शुभेच्छा दिल्या सदर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, तहसीलदार राजेश सुरडकर व इतर अधिकारी भेटीदरम्यान उपस्थित होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम गायकवाड यांनी साहेबांचे शाल व पुस्तक देऊन
सत्कार केला सोबत उपसरपंच मंगेशभाऊ गोंड व शाळा समिती सदस्य शेख नफिस व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.