चांदुर बिस्वा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी
प्रमोद हिवराळे प्रतिनिधी
चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दि. 14 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 54 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पूजन केले यावेळी प्रमुख उपस्थिती विठ्ठल तायडे, सुनील करांगळे, मोहम्मदखा, मधुकर कानडे ,अजय गायकवाड ,समाधान उंबरकर, ग्रामपंचायत कर्मचारी वुंद हजर होते