तामगाव पोलिस स्टेशन मधले दोन वर्दितील देवदुतांमुळे 'त्या' बालकाचे उपचार वेळेवर
मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपुर तालुक्यातिल वकाणा येथील राजेद्र गव्हांदे यांचा ८ वर्षीय मुलगा सुयश आजारी होता.परंतु अचानक सुयशला झटके येत असल्याने प्रकृती अचानक पणे बिघटली.गव्हांदे परिवार हे अतिशय गोरगरीब असल्याने त्यांची ऐपत खाजगी वाहनाने रुग्नलायात जाण्याची नव्हती.त्यामुळे त्यांनी १०८ रुग्ण वाहिकेला फोन केला.मात्र वेळ ४ तास लागेल असे सांगण्यात आले. नंतर त्यांनी ११२ वर फोन केला.आणि तो फोन लागला तामगांव पोलिस स्टेशनला.स्टेशन डायरीवर कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी रवि चुंबळा यांच्याशी बोलतांना गव्हांदे यांनी माझा मुलगा सिरियस आहे असे सांगितले.मदतीसाठी सहकार्य करा.
परिस्थिती ची जाणीव करुन देताच ११२ वर आलेल्या फोनची माहिती तामगांव पोलिस स्टेशचे ठानेदार प्रमोद उलेमाले यांना सांगण्यात आली.कर्तव्यदक्ष ठानेदार प्रमोद उलेमाले यांनी विना विलंब पोलिस वाहना सह कर्मचारी रवि चुंबळा व शेख इमरान यांना वकाना येथे गव्हांदे यांच्या घरी माणुसकी धर्म पाळत पोलिस वेळ प्रसंगी काय करु शकतात हे दाखवून दिले.तामगाव पोलिस कर्मचारी रवि चुंगळा व शेख इमरान पोलिस वाहना सह वकाणा येथील आजारी सुयशला व गव्हांदे कुटुंबियांना घेऊन वरवट बकाल ग्रामिण रुग्णालयात पहुचले. झटके येत असल्याने डॉक्टरांनी परिस्थिति पाहुन शेगाव रेफर केले.पोलिस वाहनाने शेगावला उपचारासाठी भरती केल्याने पोलीसांच्या मदती व सहकार्याने सुयशला वेळेवर उपचार मिळाले.पोलिसांनी गरिब गव्हांदे कुटुंबीयाची परिस्थिती जाणून घेऊन त्याच्या मदतीसाठी धावून गेल्याने तामगाव पोलिसांचे कौतुक होत असून गव्हांदे कुटुंबीयांनी तामगाव पोलिसांचे आभार मानले.