पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान त्वरित नुकसान भरपाई द्यावी - शरद राऊत यांची मागणी
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
अमडापुर: परतीच्या पावसाने चिखली तालुक्यातील काही भागात सोंगुन ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चिखली तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद राऊत यांनी केली आहे.
निसर्गाचा प्रकोपामुळे सारख्या कोसळणाऱ्या पावसाने हाती आलेले सोयाबीन चे पीक शेतकऱ्यांचा हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जर वेळीच मदत मिळाली नाही तर शेतकरी उध्दवस्त होतील असेही त्यांनी म्हटले आहे, चिखली तालुक्यातील उंद्री, अमडापुर आणि मंगरूळ नवघरे सर्कल परिसरात ११ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ते १ च्या दरम्यान भरपूर पाऊस झाला या पावसामुळे कारखेड , पिंपरखेड, हराळखेड मंगरूळ नवघरे,धोत्रा नाईक, अमडापुर आदी गावामधील शेतिक्षेत्र पाण्याखाली आले असून शेतात उभे व सोंगून ठेवलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे निसर्गापाई अखेर शेतकऱ्यावर हतबल होण्याची पाळी आली आहे दसरा झाला आता दिवाळी येणार असल्याने शेतकरी आपले स्वप्न रंगवीत असतानाच अचानक निसर्गाच्या प्रकोपमुळे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना हेक्टरी ५०हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद राऊत यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे .